परभणीगौर शिवारात दीड एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:08 IST2018-01-16T00:08:32+5:302018-01-16T00:08:38+5:30
वीज तारांच्या स्पार्किंगने दीड एकर वरील ऊस जळाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील गौर येथे १४ जानेवारी रोजी घडली.

परभणीगौर शिवारात दीड एकर ऊस जळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : वीज तारांच्या स्पार्किंगने दीड एकर वरील ऊस जळाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील गौर येथे १४ जानेवारी रोजी घडली.
गौर येथील शेतकरी किशन बापूराव जोगदंड यांनी दीड एकरावर उसाची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातून उच्चदाब क्षमतेच्या वीज तारा गेल्या आहेत. या तारांच्या खालूनच आणखी दुसºया वीज तारा गेल्या आहेत. १४ जानेवारी रोजी उच्च दाबाची तार तुटून ती खालच्या तारेवर पडल्याने स्पार्किंग झाली. यातून उसाने पेट घेतला. ही आग दीड एकरवरील उसावर पसरली. यामध्ये त्यांचा दीड एकरवील ऊस जळून खाक झाला आहे. याबाबत शेतकरी किशन जोगदंड यांनी तहसील कार्यालय, महावितरण कार्यालय व पोलीस ठाण्याकडे या आगीची माहिती दिली आहे. या प्रकरणी पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोगदंड यांनी केली आहे.