चार लाख रुपयांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST2021-03-31T04:17:37+5:302021-03-31T04:17:37+5:30
पाथरी शहरातील सेलू कॉर्नर भागात गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे २९ मार्च ...

चार लाख रुपयांचा गुटखा पकडला
पाथरी शहरातील सेलू कॉर्नर भागात गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे २९ मार्च रोजी पोलीस पथकाने छापा मारला. त्या वेळी राज्यात प्रतिबंधित असलेला ४ लाख ८ हजार २४० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आरोपी आमिर खान आलीदाद खान याच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोन आरोपी फरार झाले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अझहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे आदींनी केली.