सोनपेठमध्ये ४ लाख रुपयांचा गुटखा जप्त, स्थानिक गुनेह शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 07:22 PM2021-06-12T19:22:34+5:302021-06-12T19:23:04+5:30

उक्कडगाव शिवारात केली पोलिसांनी कारवाई

Gutkha worth Rs 4 lakh seized in Sonpeth, action taken by local crime branch | सोनपेठमध्ये ४ लाख रुपयांचा गुटखा जप्त, स्थानिक गुनेह शाखेची कारवाई

सोनपेठमध्ये ४ लाख रुपयांचा गुटखा जप्त, स्थानिक गुनेह शाखेची कारवाई

Next

सोनपेठः तालुक्यातील उक्कडगाव शिवारात 11 जूनच्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 17 हजार 790 रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुटखा आणि वाहन असा एकूण सात लाख 17 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी संशयावरून एका पिवळ्या रंगाच्या पिकअपला ( एमएच 22 एएन 1167 ) अडवले. चालक प्रल्हाद जगन्नाथ सावंत ( रा. उखळी ) याची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यात तीन लाख 56 हजार 400 रुपयांचा सुगंधी पान मसाला, 42 हजार 900 रुपयाचा गुटखा, 17 हजार 490 रुपयाचा जर्दा, तीन लाख रुपये किमतीचा अवैध माल आढळून आला. पोलिसांनी ४ लाख १७ हजार ७९० रुपयांचा गुटखा, पिकअप व मोबाईल असा एकूण सात लाख 17 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

याप्रकरणी पोलीस नाईक शेख अझर शेख जाफर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी आलेवार, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, सपोउपनी हनुमंत जक्केवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल तूपसंमदरे, पोलीस नाईक दिलावर खान, पोलीस नाईक मोबीन , पोलीस नाईक किशोर चव्हाण, पोलीस शिपाई संतोष सानप आदींनी केली. पुढील तपास सपोनी श्रीनिवास भिकाणे हे करत आहेत.

Web Title: Gutkha worth Rs 4 lakh seized in Sonpeth, action taken by local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app