मानवत तालुक्यात गुटखा विक्री वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:49+5:302021-04-08T04:17:49+5:30
ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव मानवत : येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत. येथील क्ष-किरण ...

मानवत तालुक्यात गुटखा विक्री वाढली
ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव
मानवत : येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत. येथील क्ष-किरण यंत्र, नवजात शिशूंसाठीची वार्मिंग मशीन व अन्य यंत्र केवळ कर्मचारी नसल्याने धूळ खात आहेत. येथील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करूनही आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे जनतेत नाराजी आहे.
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाळू मिळेना
मानवत : तालुक्यात रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने त्यांची बांधकामे ठप्प पडली आहेत. या योजनेचे तालुक्यात जवळपास सव्वाशे लाभार्थी आहेत. शासनाच्यावतीने वाळू देण्याची घोषणा करण्यात आली होती. ती फोल ठरली आहे.
‘आंबेगाव पाणंद रस्त्याचे काम करा’
मानवत : मानवत शिवारातील आंबेगाव पाणंद रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी होत आहे. या रस्त्याच्या कामाचे जुलै महिन्यात उद्घाटन झाले होते. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी आहे.
अग्निशमन यंत्र बसविण्याकडे दुर्लक्ष
मानवत : शहरातील तहसील, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयांत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्वर्य व्यक्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पालम येथील बँकेत गर्दी वाढली
पालम : शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याने ग्राहकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. त्यातून बँकेत गर्दी वाढू लागली आहे. गर्दी वाढताच बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले जात आहे. त्यामुळे बँकेमध्ये फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन केले जात आहे.
कैऱ्या तुटून पडत असल्याने नुकसान
पालम : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अचानक जोरदार वारे सुटत आहे. यामुळे आंब्याच्या कैऱ्या तुटून पडत आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतात मेहनत घेऊन आंब्याच्या बागा लावल्या आहेत. आता वाऱ्याने कैऱ्या गळत असल्याने नुकसान होत आहे.
सूचना फलक लावण्याकडे दुर्लक्ष
पालम : शहरातील गंगाखेड-लोहा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने रेडियमच्या खुणा व सूचना फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात अशी घटना घडली आहे.