गटप्रवर्तक, आशांना शासकीय सेवेत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST2021-05-20T04:18:03+5:302021-05-20T04:18:03+5:30
आशा वर्कर यांना १८ हजार, तर गट प्रवर्तकांना २१ हजार व बीसीएम यांना ३० हजार रुपये मानधन देऊन शासकीय ...

गटप्रवर्तक, आशांना शासकीय सेवेत समाविष्ट करा
आशा वर्कर यांना १८ हजार, तर गट प्रवर्तकांना २१ हजार व बीसीएम यांना ३० हजार रुपये मानधन देऊन शासकीय सेवेत समाविष्ट करून कायमस्वरूपी करण्यात यावे, आरोग्य उपकेंद्र कुपटा येथील आशा वर्कर यांना जाणूनबुजून त्रास देणाऱ्या एएनएम एस. एस. चौधरी यांना तत्काळ निलंबित करावे, यासह अन्य आठ मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक संघटनेने निवेदन सादर केले. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष मुगाजी बूरड, राजू देसले, सुमन पुजारी, बाबाराव आवरगंड, विश्वनाथ गवारे, नंदा शिंपले, रेखा लोंढ, रेवता कोरडे, सुमित्रा जायभाये, धनीषा दुधवडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांवर प्रशासनाने कार्यवाही न केल्यास कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.