शेतकऱ्यांचा जत्था दिल्लीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST2021-01-04T04:15:20+5:302021-01-04T04:15:20+5:30
केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी ३७ दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू ...

शेतकऱ्यांचा जत्था दिल्लीकडे रवाना
केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी ३७ दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव गावडे, कॉ. राजन क्षीरसागर, ॲड. माधुरी क्षीरसागर, माणिक कदम, प्रा. नितीन सावंत, शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली २ जानेवारी रोजी रात्री चार वाहनांतून शेतकऱ्यांचा जत्था नांदेड, नागपूरमार्गे दिल्लीकडे रवाना झाला आहे. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथून आलेले ५५ शेतकरी रात्री ११ वाजता गंगाखेड शहरात आले. स्वागताध्यक्ष रविकांत चौधरी यांच्यासह श्रीधर देशमुख, बाबुराव गळाकाटू, गोपीनाथ भोसले, प्रमोद मस्के, ओमकार पवार आदींनी या शेतकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे सर्व शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. कार्यक्रमासाठी ओमकार पवार, गोविंद यादव, संजय धारे, सुशांत चौधरी, चंद्रकांत जाधव, साहेबराव चौधरी, परमेश्वर जाधव, लालाखान पठाण, रोहिदास बदाले, पंडीत ठेंबरे, शेख जाकीर आदींनी परिश्रम घेतले.