शासकीय कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST2020-12-31T04:17:39+5:302020-12-31T04:17:39+5:30

एसटीला गर्दी सेलू : रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत सुरु नसल्याने एसटी बस गाड्यांना गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, ...

Government works dug up | शासकीय कामे खोळंबली

शासकीय कामे खोळंबली

एसटीला गर्दी

सेलू : रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत सुरु नसल्याने एसटी बस गाड्यांना गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, सेलू येथील शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी परभणी येथून ये -जा करतात. तसेच सेलू येथूनही परभणीला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सकाळी १० वाजेच्या सुमारास परभणीकडे जाणाऱ्या बसला गर्दी होत आहे.

बेशिस्त वाहतुकीमुळे वाढली कोंडी

सेलू : रेल्वेस्थानक ते बसस्थानक या मुख्य रस्त्यावर वाहनाचा बेशिस्तपणा वाढला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि फळ विक्री करणारे हातगाडे रस्त्यावरच लावली जात आहेत.

शेवटच्या दिवशी गर्दी

सेलू : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवार शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. तसेच कागदपत्रे जमा करण्याची इच्छुकांची लगबग सुरू होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक वाढल्याचे दिसून आले.

Web Title: Government works dug up