मतदारसंघ आदर्श करण्याचे ध्येय - केंद्रे

By Admin | Updated: October 21, 2014 13:26 IST2014-10-21T13:26:41+5:302014-10-21T13:26:41+5:30

सर्वसामान्य मतदारांनी मला मतदान करून माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा आदर्श करण्याचे माझे ध्येय राहणार आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केले.

The goal of ideal for the constituency - centers | मतदारसंघ आदर्श करण्याचे ध्येय - केंद्रे

मतदारसंघ आदर्श करण्याचे ध्येय - केंद्रे

>गंगाखेड : सर्वसामान्य मतदारांनी मला मतदान करून माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा आदर्श करण्याचे माझे ध्येय राहणार आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केले. 
गंगाखेड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. मधुसूदन केंद्रे निवडून आल्याबद्दल गंगाखेड शहरात सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. ज्ञानोबा हरी गायकवाड, विजयकुमार शिंदे, बालाजी निरस, साहेबराव भोसले, प्रशांत गुंडाळे, दिलीप सारडा, अँड. आनंद सूर्यवंशी, अँड. सय्यद अकबर, बालाजी शेटे, प्रमोद तम्मेवार, प्रल्हाद मुरकुटे, सुनील चौधरी, संतोष मुरकुटे, राजू साळुंके यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 
आ. डॉ. मधुसूदन केंद्रे म्हणाले, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही सर्वसामान्य जनतेची विचारांची झाली. दिग्गजांना धक्का देत विकासाच्या मुद्याला महत्त्व देत मतदारांनी स्वाभिमानी असल्याचे दाखवून दिले. तसेच येथील खुंटलेल्या विकासाला भरभराटीचे दिवस आणणार आहे. प्रत्येकाच्या समस्या या माझ्या समस्या असतील. तसेच हा विजय माझा नसून मतदार जनतेचा आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास कार्यकर्ते वनागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजकांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. (प्रतिनिधी)
 

Web Title: The goal of ideal for the constituency - centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.