विजेची तार अंगावर पडल्याने मुलगी जखमी; सोनपेठ येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:42 IST2018-03-23T17:40:03+5:302018-03-23T17:42:56+5:30
भाऊचातांडा येथे आज सकाळी खांबावरील विद्युत तार तुटून पडल्याने एक मुलगी गंभीर जखमी झाली.

विजेची तार अंगावर पडल्याने मुलगी जखमी; सोनपेठ येथील घटना
सोनपेठ (परभणी ) : तालुक्यातील भाऊचातांडा येथे आज सकाळी खांबावरील विद्युत तार तुटून पडल्याने एक मुलगी विद्युत धक्का लागून जखमी झाली.
आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनीषा राजाभाऊ जाधव ही १६ वर्षीय मुलगी अंगणात कपडे धुवत होती. यावेळी तेथून गेलेल्या खांबावरील विजेची तार अचानक तुटून तिच्या अंगावर पडली. यात विद्युत धक्का लागून ती जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
तार जुन्या आहेत
येथील खांबावरील विद्युत तारी जुन्या झाल्या आहेत. यामुळेच ही तार तुटली असावी.
- कैलास फड,अभियंता, महावितरण सोनपेठ