पळवून नेऊन युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:18 IST2021-03-05T04:18:14+5:302021-03-05T04:18:14+5:30

झाडपाल्यांचे औषध देऊन आजार बरा करतो, असे सांगणारा भोंदू वैद्य मिनीनाथ मच्छिंद्र सोनवणे (रा. मानेवाडी, ता. केज, जि. बीड) ...

The girl was abducted and tortured | पळवून नेऊन युवतीवर अत्याचार

पळवून नेऊन युवतीवर अत्याचार

झाडपाल्यांचे औषध देऊन आजार बरा करतो, असे सांगणारा भोंदू वैद्य मिनीनाथ मच्छिंद्र सोनवणे (रा. मानेवाडी, ता. केज, जि. बीड) हा गंगाखेड शहरातील धार्मिक स्थळ परिसरात असलेल्या एका घरी मागील वर्षभरापासून सतत येत होता. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तो गंगाखेड येथे आला. तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या आई, वडिलांना तसेच कुटुंबीयांना मारून टाकतो, अशी धमकी १९ वर्षीय युवतीला त्याने दिली. त्यानंतर, ९ फेब्रुवारी रोजी मिनीनाथ सोनवणे व त्याच्यासोबत असलेला अश्विनकुमार राऊत याने या युवतीला गाडीत बसून माजलगाव येथे नेले. माजलगाव येथे न्यायालय परिसरात असलेल्या एका नोटरीकडे मॅरेज सर्टिफिकेट तयार करून घेतले. त्याचदिवशी रात्री ११ वाजेच्या सुमारास मिनीनाथ सोनवणे याने या पीडित युवतीला वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील एका शेतात नेऊन अत्याचार केले. २ मार्चपर्यंत या ठिकाणी या पीडितेला डांबून ठेवले. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून ३ मार्च रोजी रात्री मिनीनाथ सोनवणे व अश्विनकुमार सुदाम राऊत (दोघे रा. मानेवाडी) या दोघांविरुद्ध अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The girl was abducted and tortured