थकीत पगारासाठी स्वच्छता कर्मचारी परभणी मनपाच्या दारी; आयुक्त म्हणतात,'माझाच पगार नाही...'

By राजन मगरुळकर | Updated: February 11, 2026 13:42 IST2026-02-11T13:35:33+5:302026-02-11T13:42:18+5:30

आयुक्तांचे शिष्टमंडळाला उत्तर, माझाच पगार नाही मीच परेशान आहे काय करणार

Ghantagadi drivers and employees at the Municipal Corporation's door for outstanding salaries; Commissioner says, I don't get my salary too... | थकीत पगारासाठी स्वच्छता कर्मचारी परभणी मनपाच्या दारी; आयुक्त म्हणतात,'माझाच पगार नाही...'

थकीत पगारासाठी स्वच्छता कर्मचारी परभणी मनपाच्या दारी; आयुक्त म्हणतात,'माझाच पगार नाही...'

परभणी : शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलित करण्याच्या एजन्सीचे देयक थकल्याने घंटागाडी १४ दिवसांपासून बंद आहेत. या घंटागाडी चालक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बुधवारी मनपाचे कार्यालय गाठून आमचे पगार करण्याची मागणी केली. यापूर्वी दोनदा निवेदन देऊनही अजून पगार झाले नाहीत. आयुक्तांच्या भेटीला काही दिवसांपूर्वी गेलेल्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी माझाच पाच महिने झाले पगार नाही मीच परेशान आहे मी परभणी सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे आश्चर्यकारक उत्तर दिल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमाद्वारे व्हिडिओतून दिली. 

परभणी शहरातील विविध भागातील कचरा संकलनाचे काम एजन्सीला देण्यात आले आहे या एजन्सीकडे असलेल्या घंटागाडीचे चालक आणि स्वच्छता कर्मचारी यांचे चार ते पाच महिन्यांचे देयक थकले आहे. महापालिकेने घंटागाडी एजन्सी यांचे १५ ते १६ महिन्याचे देयक दिलेले नाही. यामुळे मागील १४ दिवसांपासून शहरात जागोजागी कचरा साचला आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना या कर्मचारी आणि चालकांनी नऊ फेब्रुवारीला निवेदन दिले होते त्यापूर्वी सुद्धा एक निवेदन दिले. पगार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. 

याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी आधी आम्ही शहराचे नागरिक आहोत मग स्वच्छता कर्मचारी. लोकांच्या घरातील कचरा घाण रस्त्यावरील पॉलिथिन सह अन्य बाबी उचलून आम्ही रोगराई दूर करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करत आहोत मात्र आम्हीच पगारापासून थकीत असताना शहरवासीयांचा आणि आमचा दोघांचाही विचार प्रशासन करीत नसल्याचे त्यांनी व्हिडिओतून स्पष्ट केले. या निवेदनावर सय्यद हैदर, श्याम शिंदे, सय्यद सरफराज, सतीश गोरे, शेख निसार, विजय जाधव, जावेद खान, किशोर पाचपूजे, शेख सलीम यांच्यासह २५ ते ३० जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title : परभणी में सफाई कर्मचारियों का वेतन बकाया; आयुक्त बोले, 'मुझे भी नहीं मिला!'

Web Summary : परभणी में वेतन बकाया होने पर सफाई कर्मचारियों का प्रदर्शन; कचरा जमा। आयुक्त का दावा है कि उन्हें महीनों से भुगतान नहीं मिला और वे छोड़ने पर विचार कर रहे हैं।

Web Title : Parbhani sanitation workers unpaid, protest; commissioner says, 'I'm not paid either!'

Web Summary : Parbhani sanitation workers protest unpaid wages as garbage piles up. The commissioner claims he hasn't been paid for months and is considering leaving.