कोड जनरेट केल्याने वाढेल रेमेडिसीवीरचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:17 IST2021-04-10T04:17:33+5:302021-04-10T04:17:33+5:30

परभणी : जिल्ह्यात नव्याने सुरू केलेल्या कोरोना केंद्रांचा कोड जनरेट केला असून आता पुरेशा प्रमाणात रेमेडिसीवीर इंजेक्शन प्राप्त होतील, ...

Generating the code will increase the supply of remedicivir | कोड जनरेट केल्याने वाढेल रेमेडिसीवीरचा पुरवठा

कोड जनरेट केल्याने वाढेल रेमेडिसीवीरचा पुरवठा

परभणी : जिल्ह्यात नव्याने सुरू केलेल्या कोरोना केंद्रांचा कोड जनरेट केला असून आता पुरेशा प्रमाणात रेमेडिसीवीर इंजेक्शन प्राप्त होतील, अशी माहिती आ. डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली.

परभणी जिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्याण समितीचे पदाधिकारी या नात्याने आ. डॉ. राहुल पाटील यांनी ९ एप्रिलला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यात रेमेडिसीवीर इंजेक्शनचा साठा का कमी पडत आहे, नेमक्या काय अडचणी येत आहेत, असा प्रश्न बैठकीत उपस्थित केला. त्यावर परभणी जिल्ह्याला इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पावले यांनी सांगितले, जिल्ह्यात फक्त १० कोविड सेंटरची नोंद करण्यात आली असून, सद्य:स्थितीत ३० कोविड सेंटर सुरू झाले आहेत. नवीन कोविड सेंटरचे कोड जनरेट झाले नसल्याने इंजेक्शनचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. नव्याने सुरू केलेल्या कोविड सेंटरचे कोड आता जनरेट करण्यात आले असून, पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे नितीन मरेवार, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, डॉ. विक्रम पाटील, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, ज्ञानेश्वर पवार, दिलीप ताडकळसकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Generating the code will increase the supply of remedicivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.