शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गंगाखेड येथे शिक्षकाकडून लाच मागणारा केंद्रप्रमुख जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 7:11 PM

गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी एका शिक्षकाला ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास ताब्यात घेतले़

गंगाखेड (परभणी) : गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी एका शिक्षकाला ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास ताब्यात घेतले़ शिक्षक दिनीच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे़ 

गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत तक्रारदार शिक्षकाला  पडेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भरत रंगनाथ डहाळे यांनी चट्टोपाध्याय प्रस्तावाकरीता लागणाऱ्या गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी ३० आॅगस्ट रोजी ३०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सदरील शिक्षकाने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती़. त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय लाटकर, उपअधीक्षक रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली़ त्यात तथ्य आढळल्याने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास केंद्रप्रमुख डहाळे यांना त्यांच्या गंगाखेडमधील घरातून ताब्यात घेतले आहे़ 

या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास भरत रंगनाथ डहाळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, आरोपी डहाळे यांना गुरुवारी गंगाखेड येथील न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारTeacherशिक्षक