गंगाखेड, परभणीत गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:41 IST2017-11-19T00:40:57+5:302017-11-19T00:41:10+5:30
अन्न व औषध प्रशासनाने परभणी व गंगाखेड येथे धाडी टाकून गुटखा पकडला आहे़

गंगाखेड, परभणीत गुटखा पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अन्न व औषध प्रशासनाने परभणी व गंगाखेड येथे धाडी टाकून गुटखा पकडला आहे़
अन्न प्रशासनाचे आयुक्त जे़आऱ जयपूरकर व अन्न सुरक्षा अधिकारी एऩएस़ कुलकर्णी यांनी १६ नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरातील केदारनाथ मुरलीधर दाड आणि परभणी येथील गणेश ट्रेडिंग कंपनी येथे छापा टाकून ७७ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त केला़ १८ नोव्हेंबर रोजी सुरेश काशीनाथ कदम (रा़ औंढा) व परभणी शहरातील स्टेशन रोड भागातील भारत पान मटेरियल आणि वसमत रोडवरील श्री साई स्टोअर्स या दुकानांवर छापा टाकून ३६ हजार २०२ रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केली़ या कामी प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे, अनुराधा भोसले यांचे सहकार्य लाभले़