परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:25 IST2018-04-03T00:25:29+5:302018-04-03T00:25:29+5:30
एससी, एसटी व ओबीसी कर्मचाऱ्यांचे आरक्षण बंद करुन अॅट्रॉसिटी कायद्यात होत असलेल्या फेरबदलाच्या निषेधार्थ २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होत गंगाखेड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजारपेठ बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : एससी, एसटी व ओबीसी कर्मचाऱ्यांचे आरक्षण बंद करुन अॅट्रॉसिटी कायद्यात होत असलेल्या फेरबदलाच्या निषेधार्थ २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होत गंगाखेड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील विविध दलित संघटना, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी बंदला पाठिंबा दर्शविला. सोमवारी सकाळपासूनच व्यापाºयांनी दुकाने उघडली नाहीत. सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातून निषेध रॅली काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भारतीय संविधानाची पायमल्ली करुन सरकार ८५ टक्के बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पदोन्नतीमध्ये मिळणारे आरक्षण व अॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत सुरु ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनावर नगरसेवक विशाल साळवे, चंद्रकांत खंदारे, सत्यपाल साळवे, प्रमोद मस्के, रणधीर भालेराव, अशोकराव घोबाळे, मनोहर वाव्हळे, प्रा.मारोती साळवे, अॅड.अनिल सावंत, अॅड.मिलिंद क्षीरसागर, लिंबाजी घोबाळे, श्रीकांत गायकवाड, रोहिदास लांडगे आदींच्या स्वाक्षºया आहेत. बंद दरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासून कडकडीत बंद असलेल्या व्यापारपेठेतील दुकाने दुपारनंतर उघडण्यात आली.
भीम आर्मी संघटनेच्या वतीने मोर्चा
पूर्णा- पूर्णा येथेही भीम आर्मी संघटनेच्या वतीने नगरपालिकेपासून डॉ. आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार भातंबहिरे यांना देण्यात आले. यामध्ये सरकारने अॅट्रॉसिटी संदर्भात ९ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पूनर्विचार याचिका दाखल करावी. भीम आर्मीचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर आझाद यांना सर्व प्रकरणात जामीन मिळाला असताना उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यावर अन्यायकारक रासुका कायदा लावला आहे. ते काढून त्यांची निर्दोष मुक्तता करावी, भीम सैनिकांवर दाखल झालेले खटले मागे घ्यावेत आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अमित गायकवाड, भिवाजी अंभुरे, शाम नारायणकर, योगेश गायकवाड, संतोष आसोरे, विशाल थोरात, धम्मरत्न कांबळे, अमोल अहिरे, केतन कांबळे, अविनाश साबणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
येलदरी येथेही बंद
येलदरी- जिंतूर तालुक्यातील येलदरी येथेही भारत बंद आंदोलनामध्ये सहभाग घेण्यात आला. यामध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. येलदरी येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यामुळे येलदरी येथील व्यवहार दिवसभर झाले नाहीत.
जिल्हाधिकाºयांना निवेदन
परभणी- येथील अखिल सर समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला. याबाबत प्राचार्य सारंग साळवी यांनी जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी स्वप्नील बोर्डे, गौरवकुमार तारु, कांबळे, पंडित, वाघमारे, राऊत, सोनवणे, उबाळे, तुपसमिंदर आदींची उपस्थिती होती.