मानवतमधून गंगाधर कदम यांचा अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:23+5:302021-03-04T04:30:23+5:30

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मानवत मतदारसंघातून माजी आ. ...

Gangadhar Kadam's application from Manavatam withdrawn | मानवतमधून गंगाधर कदम यांचा अर्ज मागे

मानवतमधून गंगाधर कदम यांचा अर्ज मागे

Next

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मानवत मतदारसंघातून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचे बंधू गंगाधरराव बोर्डीकर यांनी आपला अर्ज मंगळवारी मागे घेतल्याने बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आ. बाबाजानी दुर्राणी व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांची यापूर्वी बिनविरोध निवड झाली आहे. आता १९ जागांसाठी ८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. याप्रक्रियेंतर्गत माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचे बंधू गंगाधरराव बोर्डीकर यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सोनपेठ मतदारसंघातून माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या विरोधात तर मानवतमधून विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते कोणत्या तालुक्यातील अर्ज परत घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर गंगाधरराव बोर्डीकर यांनी मंगळवारी मानवतमधून त्यांचा उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता पंडितराव चोखट व त्यांचा मुलगा आकाश चोखट यांचेच अर्ज राहिले आहेत. आकाश चोखट यांचा अर्ज परत घेतला जाऊ शकतो. त्यामुळे पंडितराव चोखट यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे.

विटेकर विरुद्ध बोर्डीकर लढत

दुसरीकडे सोनपेठमध्ये आता विटेकर विरुद्ध बोर्डीकर अशी लढत पाहावयास मिळणार आहे. जिंतुरातून सोनपेठमध्ये जाऊन बोर्डीकर विटेकरांना कशी लढत देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या या लढतीला अनेक राजकीय अंग असल्याचे समजते. शिवाय जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या निवडणुकांचा संदर्भ यानिमित्ताने राजकीय जाणकार मंडळी लावत आहेत.

Web Title: Gangadhar Kadam's application from Manavatam withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.