परभणीत जिंतूर रोडवरील फर्निचरचे दुकान भीषण आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:21 IST2019-03-16T15:18:16+5:302019-03-16T15:21:37+5:30
दुकाना शेजारी दोन हॉस्पिटलमधील रुग्णांना नागरिकांनी त्वरित बाहेर काढले

परभणीत जिंतूर रोडवरील फर्निचरचे दुकान भीषण आगीत खाक
परभणी : शहरातील जिंतूर रोडवरील एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे.
विशेष म्हणजे या दुकानाच्या शेजारी प्रसूतिगृह आणि इतर दवाखाने असल्याने आगीची झळ या दवाखान्यानाही बसली. सतर्क नागरिकांनी दोन्ही दवाखान्यांमधील रुग्णांना इतर ठिकाणी हलविले आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेचे दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
आगीची माहिती समजल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जिंतूर रोड परिसरामध्ये बघायचे मोठी गर्दी झाली आहे. पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तीन मजली दवाखान्यातील रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पहा व्हिडिओ :