जुना रिडज रस्त्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:46+5:302021-06-21T04:13:46+5:30

या कामाची पाहणी १९ जून रोजी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी उपसभापती अशोकराव ...

Funds of Rs | जुना रिडज रस्त्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध

जुना रिडज रस्त्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध

या कामाची पाहणी १९ जून रोजी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी उपसभापती अशोकराव चौधरी, माजी उपसरपंच शेख रफिक भाई, शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष आशाताई गायकवाड, सतीश चौधरी, ग्रामविकास अधिकारी प्रसाद सोळंके, तलाठी सुभाष होळ, तलाठी सहायक अब्दुल भाई, जिल्हा परिषदेचे अभियंता सतीश मोगरकर, सहायक अभियंता घुगे यांची उपस्थिती होती. बोरीला जोडणारे सर्व रस्ते लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी दिली. या रस्त्यामुळे बोरी व परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी ते जुना रिडज या रस्ता कामाची पाहणी करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापती अजय चौधरी, अभियंता सतीश मोगरकर, उपअभियंता घुगे, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सोळुंके, तलाठी सुभाष होळ, रफिक भाई, सतीश चौधरी यांच्यासह शेतकरी दिसत आहेत.

Web Title: Funds of Rs