गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:30+5:302021-02-05T06:05:30+5:30

पालम: तालुक्यातील ग्रामीण भागात गावाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी कमी पडू देणार नाही. यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी विकास आराखडा ...

Funds for the development of the village will not be reduced | गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

पालम: तालुक्यातील ग्रामीण भागात गावाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी कमी पडू देणार नाही. यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी विकास आराखडा तयार करावा, असे आवाहन आ. बाबाजानी दुर्राणी केले आहे.

पालम तालुक्यातील सायळा येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश जाधव, शेकापचे राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, राष्ट्रवादीचे पालम तालुकाध्यक्ष वसंत सिरस्कर, माजी जि. प. सदस्या चित्राताई दुधाटे, रायुकाँ जिल्हाध्यक्ष रितेश काळे, पालम शहराध्यक्ष इमदाद पठाण, कादरभाई गुळखंडकर, कृष्णा दळणर , गोपीनाथ तुडमे, सदाशिवआप्पा ढेले आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वाहेद खा पठाण, ज्ञानराज चौरे, गणेशराव चौरे, संभाजी चौरे, मुक्तार पठाण, ज्ञानेश्वर जोगदंड, बालाजी भंडारे, सोनू पठाण, मारोती चौरे, गणेश नवघरे, अंकुश आवाड, माणिक पुरी ,विठ्ठल लिंगायत ,दयानंद चौरे, विश्वंभर चौरे ,नारायण चौरे ,प्रवीण चौरे आदीसह सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Funds for the development of the village will not be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.