राधेधामणगाव येथे दोन गटाोत फ्रीस्टाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:45+5:302021-02-09T04:19:45+5:30
सेलू : तालुक्यातील राधे धामणगाव येथे क्षुल्लक कारणावरून काठ्या कुऱ्हाडींसह लोखंडी पाइपने दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची ...

राधेधामणगाव येथे दोन गटाोत फ्रीस्टाइल
सेलू : तालुक्यातील राधे धामणगाव येथे क्षुल्लक कारणावरून काठ्या कुऱ्हाडींसह लोखंडी पाइपने दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना शनिवार रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे रविवारी सेलू पोलिसांत दाखल करण्यात आले आहेत.
लहान मुलाने घरासमोरील वीट का उचलली म्हणून संतोष त्र्यबंक गोरे, त्र्यंबक माधवराव गोरे, अच्युत गोरे, परमेश्वर गोरे, दत्ता गोरे व डिगांबर गोरे (सर्व रा. राधे धामणगाव, ता. सेलू) यांनी बालासाहॆब आश्रोबा वाघमारे यांच्यासह भाऊ, पुतण्या, पत्नी व आई यांना कुऱ्हाडीचा तुंबा, काठ्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद बालासाहेब वाघमारे यांनी शनिवार रात्री ९.३० वाजता दिली, तर आमच्या मुलास विटा का उचलू दिल्या नाहीस म्हणून आरोपी बालासाहेब वाघमारे, सीमा वाघमारे, श्यामराव वाघमारे व स्वप्नील वाघमारे (सर्व रा. राधे धामणगाव, ता. सेलू) यांनी त्र्यंबक माधवराव गोरे यांच्यासह संतोष गोरे व मुलगी तारामती यांना धारदार विळ्याच्या सहाय्याने, लोखंडी पाइप, काठ्यांनी डोक्यात, पाठीत मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद त्र्यंबक माधवराव गोरे यांनी रविवारी रात्री अडीच वाजता दिली आहे. दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, बालासाहेब वाघमारे, श्यामराव वाघमारे तर संतोष गोरे व त्र्यंबक गोरे यांना जबर मार असल्याने पुढील उपचार्थ जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटतीर्थवाले हे करत आहेत.