पाथरी कृउबाचा पॅटर्न मराठवाडाभर राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:26+5:302021-02-05T06:04:26+5:30
पाथरी : शेतकरी, व्यापारी, हमाल व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कामकाज करणाऱ्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पॅटर्न हा मराठवाडाभर राबवावा, ...

पाथरी कृउबाचा पॅटर्न मराठवाडाभर राबवा
पाथरी : शेतकरी, व्यापारी, हमाल व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कामकाज करणाऱ्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पॅटर्न हा मराठवाडाभर राबवावा, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दि. २९ जानेवारी रोजी पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाबाजानी दुर्राणी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, सभापती अनिल नखाते, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार श्रीकांत निळे, पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, एकनाथ शिंदे, माधव जोगदंड, ॲड. मुंजाजी भाले, नारायण आढाव, लहू घाडगे, ओमप्रकाश नखाते, अलेाक चौधरी, सुनील उन्हाळे आदींची उपस्थिती होती. या वेळी बाजार समितीच्या वतीने ऑनलाइन केलेल्या ८ हजार ६०५ शेतकऱ्यांचा कापूस वेळेत खरेदी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. येथील प्रशासनाचे काम सर्व घटकांना विचार करून केले जाते, असे मुगळीकर म्हणाले. त्यानंतर बाजार समितीतील सभागृह, विश्राम कक्ष, संगणकीकृत कामकाज आदी कामांची पाहणी केली. त्यानंतर बाजार समितीच्या वतीने १ हजार मे. टन क्षमतेचे दोन गोडाऊन बांधल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.