आमिष दाखवून लुटणाऱ्या ठगांकडून पाच लाख वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST2021-01-08T04:51:06+5:302021-01-08T04:51:06+5:30
बोरड (ता. माहूर) येथील सागर राठोड यास स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून ३ जानेवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी येथे ...

आमिष दाखवून लुटणाऱ्या ठगांकडून पाच लाख वसूल
बोरड (ता. माहूर) येथील सागर राठोड यास स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून ३ जानेवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर सागर राठोड व त्याच्या दोन सहकाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ४ लाख ३५ हजार रुपये, २१ ग्रॅम सोने व ७३ हजार रुपयांचा मोबाइल असा ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी लुटला होता. याप्रकरणी सागर राठोड याच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथे कापसाच्या शेतात दडून बसलेल्या दीपक गिरमिल्या भोसले, मंगलबाई गिरमिल्या भोसले, शीतल प्रदीप पवार (सर्व रा. महातपुरी तांडा, ता. गंगाखेड) या तीन आरोपींना चार तासांत अटक केली होती. आरोपींकडून ४ लाख ३२ हजार रुपये व ७३ हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल वसूल करण्यात सोनपेठ पोलिसांना यश मिळाले आहे. ही कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, प्रवीण सोमवंशी, पोलीस कॉ. ओम यादव, वशिष्ठ भिसे, आनंद कांबळे, किरण काळे आदींनी केली.