परभणीत फर्निचरच्या दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:14 IST2020-02-03T00:13:59+5:302020-02-03T00:14:19+5:30
येथील जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर भागातील न्यू इंडिया फर्निचरच्या दुकानाला २ फेब्रुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले़

परभणीत फर्निचरच्या दुकानाला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर भागातील न्यू इंडिया फर्निचरच्या दुकानाला २ फेब्रुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले़
या घटने संदर्भात नानलपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ त्यानुसार मो़ वाजीद मो़ युसूफ यांच्या फर्निचरच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली़ मोतीराम खंदारे यांनी ही माहिती दुकान मालकांना दिली़ अग्नीशमन दलाच्या जवानांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत कार्य करून ही आग आटोक्यात आणली़ या घटनेत फर्निचरच्या दुकानातील सोफा, पलंग, अलमारी व इतर साहित्य जळून खाक झाले़ या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़