परभणीत ५४ नागरिकांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:22+5:302021-02-24T04:19:22+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन केल्यानंतरही त्याचे पालन होत नसल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि ...

परभणीत ५४ नागरिकांकडून दंड वसूल
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन केल्यानंतरही त्याचे पालन होत नसल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी स्वत: शहरात फिरून कारवाई केली. यावेळी मनपाचे तीन पथक सोबत होते. शिवाजी चौकातील दुकानांमध्ये दोन व्यापारी विनामास्क बसलेले असल्याने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे सिटी क्लब, गणपती चौक, वसंतराव नाईक यांचा पुतळा, गांधी पार्क, शिवाजी चौक या भागात मास्क न वापरणाऱ्या ५४ नागरिकांकडून १६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाई दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपायुक्त प्रदीप जगताप व मनपाचे सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे, श्रीकांत कांबळे या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अब्दुल शादाब, नयनरत्न घुगे, लक्ष्मण जोगदंड, मुकादम कुणाल भारसाखळे, दत्ता गवाले, जय मकरंद, नागेश उबाळे, प्रमोद उबाळे आदींचा पथकात समावेश होता.