बचत गट चळवळ सक्षम करण्यासाठी अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:48+5:302021-02-05T06:05:48+5:30

परभणी : महिला स्वावलंबन बचत गट सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत विविध बचतगटांना २ कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थसाहाय्य ...

Financing to enable self-help group movement | बचत गट चळवळ सक्षम करण्यासाठी अर्थसाहाय्य

बचत गट चळवळ सक्षम करण्यासाठी अर्थसाहाय्य

परभणी : महिला स्वावलंबन बचत गट सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत विविध बचतगटांना २ कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. यापुढेही ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

येथील आदर्श महिला बचत गटाच्या वतीने पारवा येथे पशुपालन व दुग्ध व्यवसाय प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. २८ जानेवारी रोजी या प्रकल्पाच्या उद्‌घाटन प्रसंगी आ.डॉ.राहुल पाटील बोलत होते. कार्यक्रमास संग्राम जामकर, नगरसेवक सुशील कांबळे, अंबिका डहाळे, यशवंत मस्के, सुजित वाघमारे, संस्थाध्यक्ष लताबाई शिर्के, सचिव उषाताई शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ.डॉ.पाटील म्हणाले, महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे, यासाठी बचत गट सहकारी पतसंस्थेने भरीव कार्य केले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात महिलांना रोजगारासाठी शिलाई मशीन कुक्कुटपालन, मिरची कांडप, मसाला उद्योग, शेळी-मेंढी पालन यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी यापुढे गायी, म्हशी व पशुपालनासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही आ.राहुल पाटील यांनी दिली. मकरंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आदर्श महिला बचत गटाच्या सदस्या कमलबाई ढवळे, मीना तवरे, सुमन तवरे, जया देशमुख, सुमनबाई सुसुते, सुनिता आवचार, रूपाली गाडेकर, कविता नंदुरे, गंगा गाडेकर, कल्पना मुळे, प्रियंका कोल्हारकर आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास महिला बचत गटाच्या सदस्या, ग्रामस्थ मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

Web Title: Financing to enable self-help group movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.