कापुस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर; 'स्वाभिमानी'चे परभणीत चक्का जाम आंदोलन

By मारोती जुंबडे | Updated: February 22, 2023 14:20 IST2023-02-22T14:20:20+5:302023-02-22T14:20:45+5:30

परभणी शहरातील खानापुर फाटा परिसरात या आंदोलनामुळे वाहतूक कोडी झाली होती.

Farmers on the streets for cotton price hike; Chakka Jam Movement in Parbhani of 'Swabhimani' | कापुस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर; 'स्वाभिमानी'चे परभणीत चक्का जाम आंदोलन

कापुस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर; 'स्वाभिमानी'चे परभणीत चक्का जाम आंदोलन

परभणी: कापूस आणि सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी किशोर ढगे यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. परभणी शहरातील खानापुर फाटा परिसरात या आंदोलनामुळे वाहतूक कोडी
झाली होती.

२०२१ व २२ या वर्षीचा पिक विमा तात्काळ द्या, उसाची एकरकमी एफआरपी द्या, कापूस, सोयाबीन व इतर शेतीमालाचे पडलेले भाव सुधारण्याची व्यवस्था निर्माण करावी, कृषी पंपाची वीज तोडणी करण्यात येऊ नेय, बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर व इतर आंदोलक शेतकऱ्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करावेत, खत व इतर कृषी निवीष्ठांचे वाढलेले भाव कमी करण्यात यावेत आदी मागण्यासांठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी सकाळी ११ ते ११:३० यावेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

Web Title: Farmers on the streets for cotton price hike; Chakka Jam Movement in Parbhani of 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.