शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:48+5:302021-02-09T04:19:48+5:30
तालुक्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. यावर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने ...

शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
तालुक्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. यावर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी वेळेवर झाली. यामध्ये कापसाचा व सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला. त्याखालोखाल तुरीची पेरणी करण्यात आली होती. पिके बहरात असतानाच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे कापूस, मूग, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तुरीलाही एकरी उतारा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन घेतले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी कल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे असल्याचे दिसून येत आहे. येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीसाठी ६० शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १०५ शेतकऱ्यांनी व मुगासाठी ४२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु, त्या ठिकाणी अद्यापपर्यंत खरेदी झालीच नसल्याची माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली.