परभणी जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीस कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 19:26 IST2018-09-05T19:25:31+5:302018-09-05T19:26:30+5:30
जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथे एका शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केली.

परभणी जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीस कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
परभणी : जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथे एका शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. राजू जयराम राठोड (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, राजू राठोड हे जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथे राहत. त्यांना ५ एकर शेती होती. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक जिंतुर शाखेचे दीड लाख रुपये व खाजगी सावकाराचे काही कर्ज होते. यातच शेतात सततच्या नापिकीने ते त्रस्त होते. यामुळे कंटाळून मंगळवारी सायंकाळी ६ वाजता राठोड यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शन खाली जमादार के. जी. पंतगे व ज्ञानेश्वर चोपडे करत आहेत.