शेतमालकाच्या त्रासाला कंटाळून सालगड्याची आत्महत्या; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By मारोती जुंबडे | Updated: September 18, 2023 19:14 IST2023-09-18T19:12:31+5:302023-09-18T19:14:05+5:30
पोखर्णी शेत शिवारातील घटना; या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतमालकाच्या त्रासाला कंटाळून सालगड्याची आत्महत्या; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी : शेत मालक व त्याच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून सालगड्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील पोखर्णी नरसिंह शेत शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब राठोड असे आत्महत्या केलेल्या सालगड्याचे नाव आहे. याप्रकरणी पूजा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उध्दव सातपुते, मंगेश उद्धव सातपुते या दोघांनी तू शेतात काम बरोबर करत नाहीस, असे म्हणत बाळासाहेब राठोड यांना त्रास दिला. या त्रासाला कंटाळून राठोड यांनी शेतातील धुऱ्यावरील जांभळीच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास पृवत्त केल्याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात पूजा राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि.वळसे हे करीत आहेत.