टंचाईग्रस्त गावांना मिळणार निम्न दुधनाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:17 IST2021-04-09T04:17:32+5:302021-04-09T04:17:32+5:30
तालुक्यातील अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना सध्या बंद पडल्या आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांसह जनावरांचे हाल होत असून, या ...

टंचाईग्रस्त गावांना मिळणार निम्न दुधनाचे पाणी
तालुक्यातील अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना सध्या बंद पडल्या आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांसह जनावरांचे हाल होत असून, या गावासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी आ. पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर दोन दिवसापूर्वी आ. राहुल पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. परभणी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच नदीपात्रात पाणी सोडले जाईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. यावेळी आ. डॉ. पाटील यांच्यासह धर्मापुरी, टाकळी बोबडे, टाकळी कुंभकर्ण, वाडी दमाई, साडेगाव, देवठाणा, साबा, मुरुंबा, सावंगी, झरी, जोडपरळी आदी गावामधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.