सहा महिन्यांत ५२४ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:29+5:302021-04-18T04:16:29+5:30
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लोकसंख्या वाढीस मर्यादा आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया योजना गावपातळीवर राबविण्यात येत आहे. त्या ...

सहा महिन्यांत ५२४ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लोकसंख्या वाढीस मर्यादा आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया योजना गावपातळीवर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात जुलै २०२० या महिन्यात ४, ऑगस्टमध्ये ४, सप्टेंबर महिन्यात १३, ऑक्टोबरमध्ये ६, नोव्हेंबर ११, डिसेंबर महिन्यात १६२ यांसह जानेवारी-२०२१ मध्ये १२१, फेब्रुवारीत १३३ आणि मार्च महिन्यात ७० अशा एकूण ५२४ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाला कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तसेच सद्यस्थितीत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने या संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर सध्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.