शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली-परभणी एसटीत जुने तिकीट देऊन वाहकाने केली प्रवाशाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 12:15 IST

हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणाºया प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे.

परभणी : हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणा-या प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे़

शहा नगर भागातील रहिवाशी शेख मुनीर शेख कालू हे बुधवारी सकाळी हिंगोली येथून उमरखेड-अहमदनगर या एमएच डीटी-४३६२ क्रमांकाच्या बसने सकाळी ९़४० वाजता परभणीला येण्यासाठी बसमध्ये बसले़ यावेळी या बसमधील वाहकाने त्यांच्याकडून ८३ रुपये घेऊन परभणीचे तिकीट दिले़ शेख मुनीर यांनी प्रारंभी घाईत ते तिकीट खिशात ठेवले़ थोड्यावेळानंतर त्यांनी तिकीटाची पाहणी केली असता, त्या तिकीटावर २६ डिसेंबर २०१७ अशी तारीख व तिकीट काढल्याची वेळ रात्री ८ वाजून ३४ मिनिट २९ सेकंदाची नमूद असल्याचे दिसून आले़ शिवाय तिकीटावरील बसचा क्रमांक एल ९८४३ होता़ त्यामुळे त्यांना हे जुने तिकीट असल्याचे लक्षात आले़ त्यांनी इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता त्यांना बरोबर तिकीट होते़

याबाबत त्यांनी संबंधित वाहकाकडे विचारणा केली असता, वाहकाने त्यांना तांत्रिक चुकीमुळे जुने तिकीट आले असेल, थोड्यावेळानंतर बोलतो असे सांगितले़ त्यानंतर त्यांनी थोड्यावेळाने पुन्हा वाहकाकडे विचारणा केली असता, वाहकाने टाळाटाळीचे उत्तर दिले़परभणीत बस येईपर्यंत वाहकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही़ सकाळी ११़४५ च्या सुमारास ही बस परभणीत आल्यानंतर प्रवासी शेख मुनीर यांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन याबाबत तक्रार केली़ त्यानंतर आगारप्रमुख धर्माधिकारी यांना याबाबत त्यांनी तक्रार अर्ज दिला़ त्यामध्ये संबंधित वाहकावर कार्यवाही करण्याची मागणी केली़ याबाबत आगारप्रमुख धर्माधिकारी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले़

टॅग्स :state transportएसटीHingoliहिंगोली