कोरोनाबाधितांना घरपोहोच उपचाराची सुविधा द्या : गव्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST2021-04-14T04:15:41+5:302021-04-14T04:15:41+5:30
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणीसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण ...

कोरोनाबाधितांना घरपोहोच उपचाराची सुविधा द्या : गव्हाणे
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणीसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील खाटा संपल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचा घरीच मृत्यू होत आहे. कोरोनाची लाट वाढत जाणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने खाटा, ऑक्सिजन व रेमडेसिविरची गरज लागणार आहे. अशा वेळेस ज्याच्या कुटुंबामध्ये कोविड रुग्ण आहे, त्यांच्या घरातील एक रूम आयसोलेशन करून घरपोहोच उपचार देण्याची सेवा दिल्यास खाटांची कमतरता भासणार नाही. तसेच या ठिकाणी लागणाऱ्या सुविधा व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यास रुग्णास घरीच योग्य उपचार मिळू शकेल. तसेच त्याची मानसिक ताणतणावातून मुक्तता होईल. सर्व घर सॅनिटायझर झाल्यामुळे त्याचा संसर्ग इतरांना होणार नाही. शिवाय ज्याच्याकडे मेडिक्लेम आहे, त्यांच्या घरात केलेली व्यवस्था व त्यांनी केलेला सर्व खर्च मेडिक्लेममध्ये ग्राह्य धरण्यात यावा. ज्याच्याकडे पॉलिसी नाही, अशा गरिबांकरिता कोविडच्या निधीतून त्यांची व्यवस्था करावी, अशीही मागणी या निवेदनात गव्हाणे यांनी केली आहे.