नांदगाव शिवारात वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अद्याप ओळख अस्पष्ट
By ज्ञानेश्वर भाले | Updated: April 7, 2023 16:55 IST2023-04-07T16:53:58+5:302023-04-07T16:55:33+5:30
मृतदेह ओळख पटविण्याच्या कामी परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आला आहे.

नांदगाव शिवारात वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अद्याप ओळख अस्पष्ट
ताडकळस (जि. परभणी) : नांदगाव शिवारातील नांदगाव ते आलापूर पांढरी परिसरातील एका लिंबाच्या झाडाखाली अंदाजे ७० ते ७५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यावरून ताडकळस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
सखाराम उत्तमराव जवंजाळ यांनी याप्रकरणी खबर दिली आहे. पाच एप्रिलला सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी नांदगाव शिवरात शेत गट नं १०१ च्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली एका ७० ते ७५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. ही बाब ताडकळस ठाण्याला कळविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी ताडकळस पथकाने भेट दिली. मृतदेह ओळख पटविण्याच्या कामी परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आला आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास संबंधितांनी सहायक पोलिस निरीक्षक कपिल शेळके, पोलिस कर्मचारी बाबासाहेब रोडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.