मोफत नेत्र शिबिरात २२४ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:22+5:302021-02-05T06:03:22+5:30

लॉयन्स क्लबच्या वतीने गंगाखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन तहसीलदार स्वरूप कंकाळ ...

Examination of 224 patients in free eye camp | मोफत नेत्र शिबिरात २२४ रुग्णांची तपासणी

मोफत नेत्र शिबिरात २२४ रुग्णांची तपासणी

लॉयन्स क्लबच्या वतीने गंगाखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते झाले. प्रा. आत्माराम टेंगसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंढे, सपोनि बालाजी गायकवाड, प्रा.डॉ. संग्राम मुंडे, डॉ. फेरोज शेख, रामेश्वर तापडिया, डॉ. सय्यद अश्फाक आदींची उपस्थिती होती. लॉयन्स नेत्र रुग्णालयातील नेत्र तज्ज्ञ डॉक्टरांनी २२४ रुग्णांची नेत्र तपासणी केली. यात ७४ रुग्ण मोतिबिंदूचे आढळल्याने शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात २० रुग्णांना नांदेड येथे पाठविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ सोन्नर, संजय धुळे, दगडू सोमाणी, केशव देशमुख, संजय तापडिया, प्रा.डॉ. बालाजी ढाकणे, विष्णुकांत जेठूरे, महादेव गीते, हरिश्चंद्र राठोड, बाबासाहेब जामगे, अतुल गंजेवार, बालाजी कांदे, संजय धारे, प्रा. राजीव आहेरकर, प्रा. अशोक केंद्रे, संजय सुपेकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Examination of 224 patients in free eye camp