भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर गंगाखेडमध्ये माजी सैनिकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 17:12 IST2019-02-26T17:02:25+5:302019-02-26T17:12:42+5:30

यावेळी भारत माता की जय, भारतीय सेनेचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Ex-servicemen celebrate at Gangakhed after the Indian Air Force's assault | भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर गंगाखेडमध्ये माजी सैनिकांचा जल्लोष

भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर गंगाखेडमध्ये माजी सैनिकांचा जल्लोष

गंगाखेड (परभणी ) : भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्याची बातमी समजताच आज दुपारी माजी सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी भारत माता की जय, भारतीय सेनेचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभेदार विश्वनाथ सातपुते, माजी सैनिक माणिक बडवणे, बाबुराव गव्हाणे, मारोती सुर्यवंशी, नारायण मुंडे, दिगांबर तांदळे, डॉ सुभाष कदम, रोहीदास लांडगे, मुरलीधर नागरगोजे, प्रदिप भोसले, शिवाजी कांबळे, गणेश सानप, केशव शेळके, गणेश सातपुते, अंकुश कांबळे, राम घटे, दिलीप साळवे, गुणवंत कांबळे, नरेंद्र भालेराव, शंकर बर्वे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. 

Web Title: Ex-servicemen celebrate at Gangakhed after the Indian Air Force's assault