तालुक्याच्या ठिकाणीही शुकशुकाटच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:42+5:302021-04-18T04:16:42+5:30
पाथरी : सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. रस्त्यावर वर्दळ कमी होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात फिरून नागरिकांना घरी थांबण्याचे ...

तालुक्याच्या ठिकाणीही शुकशुकाटच...
पाथरी : सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. रस्त्यावर वर्दळ कमी होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात फिरून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन केले.
सेलू : औषधे दुकाने वगळता किराणा, भाजीपाला आणि इतर सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. रस्त्यावरही तुरळक वाहतूक होती.
मानवत : तालुक्यातील बाजारपेठ शनिवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली. पोलीस कर्मचारी आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना घरी थांबवण्याचे आवाहन केले. त्यामुळे वाहतूक तुरळक होती.
सोनपेठ : शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद असली तरी रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी झालेली नाही. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची शहरात वर्दळ दिसून आली.
गंगाखेड : संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शनिवारी किराणा, भाजीपाला खरेदीचे ही व्यवहार झाले नाहीत. उपविभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन केले. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला.
पूर्णा : औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. शहरातील रस्त्यावरही नेहमीपेक्षा वाहतूक कमी होती.