परभणी जिल्ह्यात सात विशेष पथकांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:21 AM2019-09-03T00:21:12+5:302019-09-03T00:21:27+5:30

जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी ७ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही पथके दिवसरात्र संपूर्ण जिल्हाभरात अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून कारवाई करणार आहेत़

Establishment of seven special teams in Parbhani district | परभणी जिल्ह्यात सात विशेष पथकांची स्थापना

परभणी जिल्ह्यात सात विशेष पथकांची स्थापना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी ७ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही पथके दिवसरात्र संपूर्ण जिल्हाभरात अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून कारवाई करणार आहेत़
जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, या कालावधीत जुगार, अवैध दारू विक्री, प्रतिबंधित गुटखा, गांजा किंवा तत्सम अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची भूमिका जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली आहे़
या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी सात विशेष पथकांची अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली स्थापना करण्यात आली असून, ही पथके दिवस-रात्र संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर पाळत ठेवणार आहेत़ तसेच त्यांच्याविरूद्ध कारवाई करणार आहेत़
गणेश मंडळाच्या पेंडालमध्ये किंवा परिसरात अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास किंवा उपविभागीय पोलीस अधिकाºयांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे़
४२१ गणेश मंडळांची जिल्ह्यात नोंदणी
४जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४२१ गणेश मंडळांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ त्यामध्ये परभणी शहर व तालुक्यात १५५, गंगाखेड, पूर्णा तालुक्यात प्रत्येकी ३२, पाथरी तालुक्यात २२, सेलू तालुक्यात ९, मानवत तालुक्यात ६, जिंतूर तालुक्यात १४, सोनपेठ तालुक्यात ८ आणि पालम तालुक्यात ७ गणेश मंडळांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी केल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे़
४यापेक्षाही अनेक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली असली तरी यासंदर्भातील माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद झाली नसल्याने तशी आकडेवारी उपलब्ध होवू शकली नाही़ मंगळवारी याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे़

Web Title: Establishment of seven special teams in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.