१५ महिला बचत गटांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:52+5:302021-02-27T04:22:52+5:30
पात्री नगरपालिकेचे गटनेते जुनेद खान दुराणी यांच्या पुढाकारातून शहरामध्ये विविध प्रभागात बचत गटाची चळवळ सुरू करण्यात आली आहे २५ ...

१५ महिला बचत गटांची स्थापना
पात्री नगरपालिकेचे गटनेते जुनेद खान दुराणी यांच्या पुढाकारातून शहरामध्ये विविध प्रभागात बचत गटाची चळवळ सुरू करण्यात आली आहे २५ फेब्रुवारी रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये भाले गल्ली,नाविक गल्ली आणि रसाळ गल्ली भागात अमोल भाले यांच्या उपस्थितीत बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून नगरपालिका तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. आगामी दोन वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक १० मध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांची बँक निर्माण करण्याचे उद्दिष्ट या मेळाव्यात ठेवण्यात आले. तसेच पुढील काळात या बँकेच्या मार्फत महिलांना गृह उद्योग सुरू करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. या मेळाव्यास नगरपालिकेच्या कर्मचारी सुरेखा खाडे यांनी बचत गटातील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.