कंत्राटी ग्रामसेवकांच्या सात प्रस्तावांमध्ये त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:56+5:302021-02-05T06:05:56+5:30
परभणी : येथील जिल्हा परिषदेंतर्गत नियुक्त केलेल्या कंत्राटी ग्रामसेवकांच्या प्रस्तावांपैकी ९ प्रस्ताव त्रुटीचे प्राप्त झाल्याने त्यांची अनामत रक्कम परत ...

कंत्राटी ग्रामसेवकांच्या सात प्रस्तावांमध्ये त्रुटी
परभणी : येथील जिल्हा परिषदेंतर्गत नियुक्त केलेल्या कंत्राटी ग्रामसेवकांच्या प्रस्तावांपैकी ९ प्रस्ताव त्रुटीचे प्राप्त झाल्याने त्यांची अनामत रक्कम परत करण्याचे काम रखडले आहे.
कंत्राटी तत्त्वावर ग्रामसेवकांची नियुक्ती झाल्यानंतर ३ वर्षांनी या ग्रामसेवकांना नियमित सेवेेत समाविष्ट करून घेतले जाते. कंत्राटी सेवेत नियुक्ती देत असताना ग्रामसेवकांकडून १० हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली जाते. मात्र हेच ग्रामसेवक नियमित सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांना अनामत रक्कम परत करण्याची तरतूद आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे कंत्राटी ग्रामसेवकांची संख्या कमी आहे. सद्यस्थितीला प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेकडे नियमित झालेल्या ग्रामसेवकांपैकी १६ ग्रामसेवकांचे प्रस्ताव सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यासाठी प्राप्त झाले होते. या प्रस्तावांमध्ये ९ प्रस्ताव अचूक असून ७ प्रस्ताव त्रुटीचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने त्रुटीच्या प्रस्तावासंदर्भात पंचायत समितीस्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे. तसेच अचूक असलेल्या प्रस्तावांना वित्त व लेखा विभागाची मंजुरी मिळाली असून त्यावर प्रक्रिया सुरू आहे.