राहत कॉलनीत बसविले विद्युत रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:43+5:302021-04-19T04:15:43+5:30
राहत कॉलनी भागातील विद्युत रोहित्र जळाल्याने या ठिकाणी पर्यायी स्वरूपात एका टेम्पोमध्ये रोहित्र ठेवून वीज पुरवठा सुरू केला होता. ...

राहत कॉलनीत बसविले विद्युत रोहित्र
राहत कॉलनी भागातील विद्युत रोहित्र जळाल्याने या ठिकाणी पर्यायी स्वरूपात एका टेम्पोमध्ये रोहित्र ठेवून वीज पुरवठा सुरू केला होता. मात्र, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त होते. यासंदर्भात लोकश्रेय मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला. महावितरणचे अधीक्षक अभियंता अविनाश अन्नछत्रे, कार्यकारी अभियंता लोंढे, उपकार्यकारी अभियंता प्रमोद क्षीरसागर यांना या भागातील समस्या सांगितली. त्यानंतर शुक्रवारी महावितरणने राहत कॉलनी परिसरात नवीन विद्युत रोहित्र बसविले आहे. यावेळी लाइनमन शेख शमशुद्दीन, कर्मचारी शेख खलील शेख सलीम, सतीश जाधव, सय्यद जफर, सलीम इनामदार आदींची उपस्थिती होती.
या परिसरात कायमस्वरूपी विद्युत रोहित्र बसविल्याने विजेची समस्या दूर झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.