पालम तालुक्यातील १८ सोसायटीच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:38+5:302021-02-07T04:16:38+5:30
पालम तालुक्यातील बहुतांश सहकारी संस्थांची पंचवार्षिक मुदत संपून जवळपास ८ महिने झाले आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका होऊ शकल्या ...

पालम तालुक्यातील १८ सोसायटीच्या निवडणुका
पालम तालुक्यातील बहुतांश सहकारी संस्थांची पंचवार्षिक मुदत संपून जवळपास ८ महिने झाले आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्या आता टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. आगामी ३१ मार्चनंतर या निवडणुका होणार आहेत. त्यात रावराजूर, बनवस, चाटोरी, मोजमाबाद, पारवा, वाडी खुर्द, वाडी बुद्रुक, मुतदखेड, केरवाडी, सिरपूर, सेलू, डिग्रस, सादलापूर, पेंडू बुद्रुक, आरखेड, फळा, सोमेश्वर, पिंपळगाव मुरुडदेव येथील कार्यकारी सेवा संस्थांचा समावेश आहे. त्यांच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस सहायक निबंधक गिनगिने, सहकार अधिकारी समाधान पवार, सहकार आधिकारी तांबोळी, आधिकारी सय्यद, सूजय कांबळे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत मतदार याद्या तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सहकार अधिकारी समाधान पवार यांनी दिली. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांचे पीक कर्ज देण्यात चेअरमन यांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका ग्रामपंचायत निवडणुकीसारख्या होऊ लागल्या आहेत.