परभणी जिल्ह्यात आठ बसेस फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:19 IST2018-07-21T00:17:58+5:302018-07-21T00:19:18+5:30
परभणी आणि जिंतूर तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन ८ बस फोडल्याची घटना २० जुलै रोजी घडली. खानापूर फाटा येथे हिंगोली आगाराची एम.एच.२०, बी.एल.२३१८ या बसवर १० ते १२ जणांनी दगडफेक केली. यामध्ये बसचे २५ हजारांचे नुकसान झाले. चार ते पाच प्रवाशांनाही मार लागला आहे.

परभणी जिल्ह्यात आठ बसेस फोडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी आणि जिंतूर तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन ८ बस फोडल्याची घटना २० जुलै रोजी घडली.
खानापूर फाटा येथे हिंगोली आगाराची एम.एच.२०, बी.एल.२३१८ या बसवर १० ते १२ जणांनी दगडफेक केली. यामध्ये बसचे २५ हजारांचे नुकसान झाले. चार ते पाच प्रवाशांनाही मार लागला आहे. तसेच वसमत रोडवर परभणी- वसमत (एम.एच.१४ बीटी १३६३), कळमनुरी- परभणी (एम.एच.२० डी ९९३१), विसावा कॉर्नर येथे परभणी- जिंतूर (एम.एच.२० बीएल ६२१) या बसवर दगडफेक झाली. याबाबत नवा मोंढा व नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बस सेवा ठेवली बंद
दगडफेकीच्या घटनांमुळे चारही आगारातील बस सेवा एका तासासाठी बंद ठेवली होती, असे विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाट यांनी सांगितले.