धुळीच्या लोटामुळे प्रवास बनला कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:37+5:302021-02-09T04:19:37+5:30

‘विश्रामग्रह प्रवाशांसाठी खुले करा’ ’मानवत : मानवत रोड येथील रेल्वे स्थानकावरून पाथरी आणि तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. काही ...

The dust made the journey difficult | धुळीच्या लोटामुळे प्रवास बनला कठीण

धुळीच्या लोटामुळे प्रवास बनला कठीण

‘विश्रामग्रह प्रवाशांसाठी खुले करा’

’मानवत : मानवत रोड येथील रेल्वे स्थानकावरून पाथरी आणि तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. काही रेल्वे या स्थानकावर उशिरा पोहोचत आहेत. अशात स्थानकावर सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

धान्य वेळेत मिळत नसल्याने नाराजी

गंगाखेड: महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाभार्थ्यांना वेळेत धान्य वितरीत होत नाही. धान्य स्वस्त मिळावे म्हणून रेशन दुकानातून लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात येते. धान्य वितरणाची व्यवस्था अधिक पारदर्शी होऊन वेळेत धान्य उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

बाजारात नागरिकांना मास्कचा विसर

मानवत : अनलॉक पाचनंतर राज्य सरकारने अटी व शर्ती लावून तालुक्याच्या ठिकाणी आठवडे बाजार भरवण्याची परवानगी दिली आहे. मात्र सोमवारी आठवडी बाजारात येणारे भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते मास्क लावत नसल्याचे दिसून आले.

ताडकळस रस्त्यावर धोकादायक खड्डे

पालम : पालम ते ताडकळस या राज्य रस्त्यावर चौपदरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यावर पूल बांधण्यात येत आहे; पण या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. पूलाच्या नजीक मोठ मोठे खड्डे खोदण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

बेशिस्त वाहतुकीमुळे वाढली कोंडी

सेलू : रेल्वेस्थानक ते बसस्थानक या मुख्य रस्त्यावर वाहनांचा बेशिस्तपणा वाढला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि फळ विक्री करणारे हातगाडे रस्त्यावरच लावले जात आहेत.

Web Title: The dust made the journey difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.