मशागत करताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळले, जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 17:46 IST2018-05-25T17:46:45+5:302018-05-25T17:46:45+5:30
शेतामध्ये नांगरणी सुरू असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळयाची घटना आज दुपारी घडली.

मशागत करताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळले, जीवितहानी नाही
जिंतूर (परभणी ) : शेतामध्ये नांगरणी सुरू असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळयाची घटना आज दुपारी घडली. तालुक्यातील सायखेडा येथे झालेल्या या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सायखेडा येथील शेतकरी प्रभाकर ढाकणे यांच्या शेतामध्ये मशागतीची काम सुरू आहे. आज त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरणी केली जात होती़ दरम्यान अचानक, ट्रॅक्टर चालकाचे अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल ट्रॅक्टर चालकासह जवळच असलेल्या विहिरीत कोसळले. ३० फुट खोल असलेल्या या विहिरीत पाणी होते, यामुळे ट्रॅक्टर पूर्णतः पाण्यात बुडाले. तर चालक सुदैवाने बचावला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.