जुन्या वादातून केकरजवळ्यात दोन गटांत हाणामारी, परस्परविरोधी गुन्हा दाखल
By ज्ञानेश्वर भाले | Updated: January 31, 2024 18:17 IST2024-01-31T18:17:40+5:302024-01-31T18:17:51+5:30
दोन्ही गटातील सहा जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जुन्या वादातून केकरजवळ्यात दोन गटांत हाणामारी, परस्परविरोधी गुन्हा दाखल
मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील केकरजवळा झालेल्या हाणामारीच्या घटनेत परस्पर विरोधी तक्रारीवरून मानवत ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय आश्रोबा उपाडे (रा. हमदापूर, ता. मानवत) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, नारायण खोबराजी चव्हाण, सोमित्रा नारायण चव्हाण दोन्ही (रा. केकरजवळा, ता. मानवत) व अन्य दोघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात काठीने मारून दुखापत केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी संजय उपाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नारायण खोबराजी चव्हाण (रा. केकरजवळा) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, नामदेव खोबराजी चव्हाण, सुरेश नामदेव चव्हाण, संजय उफाडे, विजय उफाडे यांनी भावजयीला का बोलतो म्हणून शिवीगाळ करत हातातील लाकडाने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नारायण चव्हाण यांच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोउनि मधुकर चट्टे करीत आहेत.