मराठवाड्यातील उद्योगांच्या अडचणी सोडविणार- दुधगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:41+5:302021-02-09T04:19:41+5:30
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीची सोमवारी ऑनलाईन विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना दुधगावकर बोलत होते. यावेळी ...

मराठवाड्यातील उद्योगांच्या अडचणी सोडविणार- दुधगावकर
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीची सोमवारी ऑनलाईन विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना दुधगावकर बोलत होते. यावेळी भाजपा उद्योग आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष प्रदीप पेशकार, प्रदेश सहसंयोजक सुधीर धुत्तेकर, मराठवाडा सहसंयोजक प्रवीण कस्तुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना दुधगावकर म्हणाले की, मराठवाड्यातील उद्योग धंदे वाढीस लागले पाहिजेत, ही भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे भृमिका आहे. या दृष्टीकोणातून मराठवाड्यातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी भाजपा उद्योग आघाडी कटिबद्ध आहे. पदाधिकाऱ्यांनीही यादृष्टीकोणातून उद्योगांच्या अडचणी सोडिण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही दुधगावकर म्हणाले. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी कसे काम करावे, यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर दुधगावकर, पेशकर यांनी मराठवाड्यातील नामांकित उद्योजकांशी चर्चा केली. उद्योग आघाडी प्रदेश कार्यकारणीची बैठक पुणे येथे ११ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.