वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 20:05 IST2022-07-14T20:05:53+5:302022-07-14T20:05:58+5:30

डॉ. इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केली आहे.

Dr. Vasantrao Naik as the Vice Chancellor of Marathwada Agricultural University. Indra Mani | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली येथील संशोधन सहसंचालक प्रा.इंद्र मणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी डॉ. इंद्र मणी यांची नियुक्ती जाहीर केली. मावळते कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांचा कार्यकाळ ६ मे रोजी संपल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ. इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य व कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी एनसीईआरटीचे निवृत्त महासंचालक प्रा.जगमोहन सिंह राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ.ए.के.सिंह व कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे सदर समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.इंद्र मणी यांच्या निवडीची घोषणा केली आहे.

Web Title: Dr. Vasantrao Naik as the Vice Chancellor of Marathwada Agricultural University. Indra Mani

टॅग्स :parabhaniपरभणी