जिल्ह्याचा दहावीचा ९८.९४ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:00+5:302021-07-17T04:15:00+5:30
नियमित विद्यार्थ्यांचा निकाल उंचावलेलाच जिल्ह्यातून दहावीसाठी नियमित अंतर्गत २६ हजार ९५७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी २६ हजार ९३२ ...

जिल्ह्याचा दहावीचा ९८.९४ टक्के निकाल
नियमित विद्यार्थ्यांचा निकाल उंचावलेलाच
जिल्ह्यातून दहावीसाठी नियमित अंतर्गत २६ हजार ९५७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी २६ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ९९.९० टक्के इतकी आहे. पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील १ हजार ७६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ८४.२४ टक्के आहे.
१५ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
जिल्ह्यातील १५ हजार ३३८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, तर १० हजार ४०४ प्रथम आणि ११७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले असल्याचे निकालांती स्पष्ट झाले आहे. पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये ८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ३६ प्रथम, ३५ द्वितीय तर १ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.
वेबसाइट बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता यावा, म्हणून विविध चार वेबसाइट उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांनी या वेबसाइटवरून निकाल पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु दिवसभर चारही वेबसाइट बंदच असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वैयक्तिक निकाल बोर्डाने तयार केले की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.