चार कंपन्यांकडून जिल्ह्याला मिळणार रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:38+5:302021-04-18T04:16:38+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ...

चार कंपन्यांकडून जिल्ह्याला मिळणार रेमडेसिविर
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने जिल्ह्यासाठी पुरवठा होत असलेले रेमडेसिविर इंजेक्शन कमी पडत आहेत. या इंजेक्शनचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. रुग्णालयनिहाय रुग्णांची संख्या आणि आवश्यक असणारे इंजेक्शन याची मागणी दररोज नोंदविली जात आहे. प्राप्त झालेला साठ्याचा त्याच रुग्णालयांना डॉक्टरांमार्फत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णापर्यंत इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली.
जिल्ह्यासाठी नागपूर येथील केंद्रातून रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत ठराविक एकाच कंपनीकडून हे इंजेक्शन उपलब्ध होत होते. मात्र येथून पुढे हेट्रो लिमिटेड, मायलॉन लिमिटेड, पडीला फार्मा आणि सिप्ला या कंपन्यांचे इंजेक्शन जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बळीराम मारेवाड यांनी दिली.